गांधीनगर : कुख्यात गुंड छोटा शकील याच्या गँगमधील चौघांना अटक करण्यात आली आहे. गुजरात दहशतवादी विरोधी पथकाने कारवाई करत, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून या चौघांना ताब्यात घेतले आहे.
छोटा शकील गँगच्या चौघांना अटक; गुजरात एटीएसची कारवाई - गुजरात एटीएस कारवाई
गुजरातचे माजी गृहराज्य मंत्री गोर्धन झडाफिया यांना मारण्यासाठी काही गुंडांना सुपारी देण्यात आली होती. त्यांपैकी एक शार्पशूटर इरफान शेख याला गुजरात एटीएसने ताब्यात घेतले होते. त्याला बोलते केल्यानंतर त्याच्याकडून आणखी चार गुंडांबाबत माहिती मिळाली.
![छोटा शकील गँगच्या चौघांना अटक; गुजरात एटीएसची कारवाई Gujarat ATS arrests 4 more accused of Chhota Shakil gang...](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8529618-932-8529618-1598192089978.jpg)
छोटा शकील गँगच्या चौघांना अटक; गुजरात एटीएसची कारवाई
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातचे माजी गृहराज्य मंत्री गोर्धन झडाफिया यांना मारण्यासाठी काही गुंडांना सुपारी देण्यात आली होती. त्यांपैकी एक शार्पशूटर इरफान शेख याला गुजरात एटीएसने ताब्यात घेतले होते. त्याला बोलते केल्यानंतर त्याच्याकडून आणखी चार गुंडांबाबत माहिती मिळाली.
झडाफिया यांची हत्या करण्याच्या कटात या चौघांचाही समावेश होता, अशी माहिती याआधी अटक करण्यात आलेल्या शार्पशूटर शेखकडून मिळाली आहे.