महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गुजरात : ५०० कोटींच्या हेरॉईनसह ९ ईराणी नागरिकांना अटक - anti terrorist squad

इंडियन कोस्ट गार्ड आणि एटीएस अधिकाऱ्यांनी अंमली पदार्थांच्या विरोधात छेडलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. दोन्ही विभागांनी संयुक्तरित्या राबवलेल्या मोहिमेत ५०० कोटी रुपयांचा हेरॉईनचा साठा जप्त करण्यात आला आहे. यासह ९ ईराणी नागरिकांना अटक करण्यात आलेली आहे.

गुजरात : ५०० कोटींच्या हेरॉईनसह ९ ईराणी नागरिकांना अटक

By

Published : Mar 27, 2019, 11:26 PM IST

Updated : Mar 27, 2019, 11:39 PM IST

गांधीनगर - इंडियन कोस्ट गार्ड आणि एटीएस अधिकाऱ्यांनी अंमली पदार्थांच्या विरोधात छेडलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. दोन्ही विभागांनी संयुक्तरित्या राबवलेल्या मोहिमेत ५०० कोटी रुपयांचा हेरॉईनचा साठा जप्त करण्यात आला आहे. यासह ९ ईराणी नागरिकांना अटक करण्यात आलेली आहे.

हेरॉईनचा साठा एका बोटीतून जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनचे वजन जवळपास १०० किलोग्राम आहे. गुजरातच्या पोरबंदरच्या बंदरातून हेरॉईन जप्त करण्यात आले. चालकाने पुरावे नष्ट करण्यासाठी बोटीला आग लावली. एटीएसला एका ईराणी बोटीतून अंमली पदार्थाची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. पाकिस्तानच्या समुद्रामार्गे ही तस्करी करण्यात येत होती.

हा साठा एका पाकिस्तानी नागरिकाने पाठवल्याची माहिती मिळत आहे. अटक करण्यात आलेल्या ईराणी नागरिकांनी चौकशीत ही माहिती दिली. या पाकिस्तानी नागरिकांचे नाव हमीद मलिक असल्याचे एटीएसने सांगितले आहे. एटीएसने पुढे सांगितले आहे, की हा साठा कोणाला देण्यात येणार होता याची माहिती मिळाली असून लवकरच त्यालाही अटक करण्यात येईल, अशी माहिती एटीएसने पत्रकार परिषदेत दिली आहे.

Last Updated : Mar 27, 2019, 11:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details