अहमदाबाद - लॉकडाऊनचा देशातील जनतेवर आणि त्यातही विशेषतः कामगार, मजूर आणि हातावर पोट असणाऱ्यांवर संकट कोसळले आहे. गुजरातमधील भरुच भागातील स्थलांतरित कामगारांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केल्याची घटना घडली. प्रशासनाने त्यांची मूळ राज्यात परत जाण्याची व्यवस्था करावी ही मागणी कामगारांनी केली. यावेळी पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान परिस्थिती नियत्रंणामध्ये आहे.
गुजरातमधील भरूचमध्ये स्थलांतरित मजुरांचे आंदोलन - स्थलांतरीत मजुरांचे आंदोलन
गुजरातमधील भरुच भागातील स्थलांतरित कामगारांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केल्याची घटना घडली. यापूर्वी कच्छ भागातील स्थलांतरित कामगारांनीदेखील महामार्ग रोखत आंदोलन केले होते.
Gujarat: Agitated migrant workers gather in Bharuch
यापूर्वी कच्छ भागातील स्थलांतरीत कामगारांनीदेखील महामार्ग रोखत आंदोलन केल्याची घटना घडली होती. संतप्त कामगारांनी पोलिसांवर दगडफेक केली होती.
भारतात लाखो कामगारांचे जीवन हे रोज मिळणाऱ्या कामावर असून त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांचा दिवस कसाबसा जातो. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात पोट भागवणार कसं? हा यक्षप्रश्न या मजूर वर्गासमोर आ वासून उभा राहिला. हातावर पोट असलेले हे मजूर आपल्या घराचं ओढीनं पायीच मैलोनमैल प्रवास करत आहेत.