महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

वाहतूक नियमांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी अफलातून कल्पना, हेल्मेट घालून खेळला गरबा - dance group from a 'garba class' in Surat

गुजरातमधील सुरत येथे  'गरबा क्लास' या डान्स ग्रुपने हेल्मेट घालून गरबा खेळला आहे. सध्या हेल्मेट गरबाचा व्हिडिओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हेल्मेट घालून खेळला गरबा

By

Published : Sep 30, 2019, 8:22 AM IST

सुरत -दांडिया आणि गरबा या दोन नृत्यकलांचा उगम असलेल्या या नवरात्रौत्सवाची शान संपूर्ण देशात काहीशी निराळीच असते. गुजरातमधील सुरत येथे 'गरबा क्लास' या डान्स ग्रुपने हेल्मेट घालून गरबा खेळला आहे. सध्या हेल्मेट गरबाचा व्हिडिओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे.


गुजरातच्या गरबा आणि दांडियाच्या नृत्यपरंपरेने केवळ देशातच नव्हे, तर संपूर्ण जगात प्रचंड प्रसिद्धी मिळवली आहे. शारदीय नवरात्र उत्सवाला रविवारपासून देशभरात जल्लोषाला सुरुवात झाली आहे. दरवर्षी या उत्सवादरम्यान तरुणाई वेगवेगळ्या प्रकारच्या थीमवर गरबा खेळते. यावर्षी देशभरात नविन वाहतूक नियम लागू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जनसामान्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागृती व सजगता निर्माण व्हावी यासाठी एका डान्स ग्रुपने हेल्मेट घालून गरबा खेळला आहे.


याचबरोबर या नवरात्रोउत्सामध्ये तरुणाई वेगवेगळ्या प्रकारचे टॅटू गोंदवून घेत असते. मात्र या वर्षीची टॅटूची थीम काही अफलातूनच आहे. आणि काश्मीरमधील कलम ३७० , मोदी -ट्रम्प यांच्या मैत्री, चांद्रयान -२ आणि नवे वाहतूक नियम अशा मुद्यांवर तरुणाई टॅटूद्वारे व्यक्त होत आहे. हे टॅटू मोठे लोकप्रिय झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details