अहमदाबाद - राजकोटमधील ८ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रकार उघडकीला आला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला गजाआड केले आहे. हरदे मश्रू असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
आरोपीने राजकोट शहरातील बाह्यवळणावरून पीडित बालिकेचे शुक्रवारी अपहरण केले होते. त्यानंतर आरोपीने पीडितेवर बलात्कार केला होता, असे राजकोट पोलीस आयुक्त मनोज अग्रवाल यांनी सांगितले. आरोपीला रविवारी अटक करण्यात आली आहे. त्याच्या शर्टवर रक्ताचे थेंब आढळून आले आहेत. त्याचे न्यावैद्यकीय परीक्षण करण्यात येणार आहे. आरोपीला जास्तीत कठोर शिक्षा मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
गुजरात : ८ वर्षीय मुलीचे अपहरण करून बलात्कार करणारा आरोपी गजाआड - POCSO act
आरोपीने राजकोट शहरातील बाह्यवळणावरून पीडित बालिकेचे शुक्रवारी अपहरण केले होते. त्यानंतर आरोपीने पीडितेवर बलात्कार केला होता, असे राजकोट पोलीस आयुक्त मनोज अग्रवाल यांनी सांगितले.
पीडिता ही रोजदांरीवर काम करणाऱ्या आईशेजारी बागेत झोपली होती. त्यावेळी आरोपीने बालिकेचे अपहरण करून शेजारी असलेल्या पुलावर तिच्यावर बलात्कार केला होता.
पीडितेच्या आईने थोराला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी पोक्सो कायद्यासह इतर कलमान्वये आरोपीवर गुन्हा दाखल केला होता. हैदराबादमधील डॉक्टर महिलेवरील बलात्कार व खूनाच्या प्रकरणानंतर देशात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अशा परिस्थितीत गुजरातमध्ये बालिकेवर बलात्काराचा गुन्हा घडल्याने राज्यातील नागरिकांमधून संतापाची भावना व्यक्त करण्यात येत होती.