सोलन - हिमाचल प्रदेशातील सोलन येथील नाहन कुमारहट्टी रोडवरील एक इमारत कोसळली आहे. इमारत अचानक कोसळल्याने अनेकजण ढिगाऱ्याखाली दबले आहेत. यामध्ये भारतीय सेनेच्या जवांनांचाही समावेश आहे. ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाचे पथक घटनास्थळी बचावकार्यासाठी पोहचले आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये मोठी दुर्घटना; गेस्ट हॉऊसची इमारत पडल्याने दोघांचा मृत्यू, अनेकजण जखमी - सोलन
जोरदार पावसामुळे इमारतीचा पाया खचल्याने इमारत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. इमारतीचा वापर हॉटेलसाठी करण्यात येत होता. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.
इमारत दुर्घटना 22
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जोरदार पावसामुळे इमारतीचा पाया खचल्याने इमारत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. इमारतीत एकूण कितीजण होते याची माहिती अद्याप मिळाली नाही. इमारतीचा वापर हॉटेलसाठी करण्यात येत होता. या इमारतीत भारतीय सेनेचे २४ पेक्षा जास्त जवान आहेत. पोलीस आयुक्त शिवकुमार शर्मा यांनी माहिती देताना सांगितले आहे, की माहिती मिळताच बचाव पथकाला घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे.
Last Updated : Jul 14, 2019, 7:38 PM IST