महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

#GSAT 30: इस्रोचे 2020 वर्षातील पहिले प्रक्षेपण यशस्वी; कम्युनिकेशन, इंटरनेट सेवेला होणार फायदा - GSAT 30

फ्रान्सच्या अरिआन लॉन्च पॅड कॉम्प्लेक्स येथून जीसॅट 30 या हाय पॉवर टेलीकम्युनिकेशन उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. 38 मिनीटांनंतर हा उपग्रह अंतराळातील जीओसिंक्रोनस ऑर्बिटमध्ये यशस्वीरित्या दाखल झाला.

GSAT 30 successfully launched
GSAT 30: इस्रोचे यशस्वी प्रक्षेपण

By

Published : Jan 17, 2020, 7:59 AM IST

Updated : Jan 17, 2020, 12:28 PM IST

बंगळूरू - भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (ISRO) या वर्षातील पहिले यशस्वी प्रक्षेपण केले आहे. फ्रान्सच्या अरिआन लॉन्च पॅड कॉम्प्लेक्स येथून जीसॅट 30 या हाय पॉवर टेलिकम्युनिकेशन उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. 38 मिनिटांनंतर हा उपग्रह अंतराळातील जिओसिंक्रोनस ऑर्बिटमध्ये यशस्वीरित्या दाखल झाला. यामुळे इंटरनेट सेवेला मोठा फायदा होणार आहे.

GSAT 30: इस्रोचे यशस्वी प्रक्षेपण

जीसॅट हा 'हाय पॉवर' उपग्रह असून याद्वारे टेलिव्हीजन, टेलिकम्युनिकेशन, आणि अन्य प्रक्षेपण सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच दूरसंचार सेवेत मोठी क्रांती होणार आहे.

जीसॅट-30 या दूरसंचार उपग्रहाचे दक्षिण अमेरिकेच्या उत्तरपूर्व तटाजवळील कैरो बेटावरून यशस्वी प्रक्षेपण केले आहे. आज, शुक्रवारी पहाटे दोन वाजून 35 मिनिटांनी उपग्रहाचे फ्रान्सच्या हद्दीतील बेटावरून हा उपग्रह सोडण्यात आला आहे. इस्रोच्या इनसॅट/जीसॅट श्रेणीतील या उपग्रहाने 12सी आणि 12केयु बँड ट्रान्सपॉन्डर्ससह प्रक्षेपण केले.

Last Updated : Jan 17, 2020, 12:28 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details