गुरुदासपूर - शिखांचे धर्मगुरू गुरू नानक यांनी आपल्या आयुष्यातील अखेरची 18 वर्षे भारत-पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या कर्तारपूरमध्ये घालवली होती. तेथील धर्मस्थळापर्यंत थेट जाण्यासाठीचा मार्ग शनिवारी खुला झाला आहे.
कित्येक वर्षापासूनचे स्वप्न आज पुर्ण होतयं, भाविकांनी व्यक्त केल्या भावना...
पाकिस्तानमध्ये गुरुनानक यांचे पवित्र स्थळ साडेचार किमी आतमध्ये आहे. गुरुदासपूर येथील तपासणी चौकीच्या मंजूरी नंतरच भाविकांना पाकिस्तानात जाण्याची परवानगी देण्यात आली. चेकपोस्टच्या उद्घाटनापूर्वी शीख भक्तांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आम्हाला यापूर्वी दुरवरून नानक यांचे दर्शन घ्यावे लागायाचे. मात्र आता आम्ही जवळून दर्शन घेणार आहोत. आम्ही या क्षणाची कित्येक दिवसांपासून वाट पाहत होतो, अशा भावना भाविकांनी व्यक्त केल्या आहेत.
कर्तारपूर कॉरिडॉर ग्राउंड रिपोर्ट
पाकिस्तान-भारत दरम्यान काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतरपासून तणाव आहे. पाकिस्ताने आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर भारतावर टीका केली. यावेळी चीननेदेखील पाकिस्तानला पाठिंबा दिला. या पार्श्वभूमिवर सुरु झालेल्या कर्तारपूर कॉरिडॉरला महत्त्व प्राप्त होते.
पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातल्या नुरवाला जिल्ह्यापर्यंत कर्तारपूर कॉरिडॉर उभारण्यात आला आहे. भारतातील डेरा बाबा नानक ते पाकिस्तानातील गुरु नानक साहिब स्थळ या कॉरिडॉरने जोडण्यात आले आहे. पाकिस्तानमध्ये गुरुनानक यांचे पवित्र स्थळ साडेचार किमी आतमध्ये आहे. २४ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तानने दोन्ही देशांच्या 'झिरो पॉईंट' ठिकाणी करारावर सह्या केल्या होत्या.