महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

‘आधी लगीन मतदानाचे’ नवरदेव शेरवानीत पोहोचला मतदान केंद्रावर

शहरातील लक्ष्मी नगरमधील शकरपूर मतदान केंद्रावर एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले आहे. नवरदेवाने देखील लग्नापूर्वी मतदान केंद्रावर येऊन आधी मतदानाचा हक्क बजवला.

नवरदेव शेरवानीत पोहोचला मतदान केंद्रावर
नवरदेव शेरवानीत पोहोचला मतदान केंद्रावर

By

Published : Feb 8, 2020, 5:51 PM IST

नवी दिल्ली -राजधानी दिल्लीमध्ये विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान सुरू आहे. सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. शहरातील लक्ष्मी नगरमधील शकरपूर मतदान केंद्रावर एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले आहे. नवरदेवाने देखील लग्नापूर्वी मतदान केंद्रावर येऊन आधी मतदानाचा हक्क बजवला.

‘आधी लगीन मतदानाचे’ नवरदेव शेरवानीत पोहोचला मतदान केंद्रावर


वरात निघाल्यानंतर नवरदेव धनंजय धयानी यांनी विवाहापूर्वी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. इतकेच नाही तर त्यांनी मतदान केंद्राबाहेर डान्सदेखील केला. लग्नाच्या घाई-गडबडीमध्ये मतदान करण्यास पोहचलेल्या धनंजय यांनी लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मतदान करण्याची संधी ही फक्त 5 वर्षांमधून एकदाच मिळते. त्यामुळे कितीही म्हत्त्वाचे काम असले, तरी मतदान करावे, असे धनंजय म्हणाले.


दिल्लीमध्ये सांयकाळी 5 वाजेपर्यंत 44.52 टक्के मतदान झाले आहे. विधानसभेच्या 70 जागांसाठी 672 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदानासाठी पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. सुमारे 1 कोटी 47 लाखांहून अधिक नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मागच्या पाच वर्षांसाठी दिल्लीकरांनी आम आदमी पक्षाच्या हाती सत्ता दिली होती. यावेळची निवडणूक भाजप आणि आपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details