महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात पोलीस आयुक्तालयावर ग्रेनेड हल्ला, १० जखमी - kashmir breaking news

जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात पोलीस उपायुक्त कार्यालयाबाहेर ग्रेनेड हल्ला झाला आहे. या हल्ल्यात १० जण जखमी झाले आहेत.

संग्रहित छायाचित्र

By

Published : Oct 5, 2019, 11:59 AM IST

Updated : Oct 5, 2019, 12:32 PM IST

श्रीनगर -जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात पोलीस उपायुक्त कार्यालयाबाहेर ग्रेनेड हल्ला झाला आहे. या हल्ल्यात १० जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एक वाहतूक पोलीस आणि एका पत्रकाराचा समावेश आहे. हल्ल्यात कोणीही गंभीर जखमी झाले नसल्याची माहिती मिळाली आहे. या बाबतचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी हल्लेखोराचा तपास सुरू केला आहे. हल्लेखोराची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

बातमीमध्ये वापरण्यात आलेले छायाचित्र संग्रहित आहे.

हेही वाचा - पाकिस्तानकडून तब्बल २ हजार २२५ वेळा शस्त्रसंधीचे उल्लघंन

Last Updated : Oct 5, 2019, 12:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details