श्रीनगर -काश्मिरातील शोपियान जिल्ह्यात संशयित दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर ग्रेनेड हल्ला करत गोळीबार केला. जिल्ह्यातील बोनबझार भागात ही घटना आज(बुधवार) घडली. या हल्ल्यात जीवितहानी किंवा जवान जखमी झाल्याची माहिती मिळाली नाही.
काश्मीर : शोपियानमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर ग्रेनेड हल्ला - ग्रेनेड हल्ला शोपियान
काश्मिरातील शोपियान जिल्ह्यात संशयित दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर ग्रेनेड हल्ला केला, तसचे गोळीबार केला. हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध सुरु केला आहे.
![काश्मीर : शोपियानमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर ग्रेनेड हल्ला संग्रहित छायाचित्र](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-01:42:44:1596615164-8302142-gre.jpg)
संग्रहित छायाचित्र
हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध सुरु केला आहे. काश्मीरला स्वायत्तता देणारे कलम 370 रद्द केल्याच्या घटनेला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर काश्मिरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तरीही दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला घडवून आणला. काश्मीरात या वर्षाच्या सुरुवातीपासूून सुमारे 150 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.