महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'ग्रीन मॅन ऑफ लुधियाना' आहेत तरी कोण, जाणून घ्या 'या' कर्तबगार अधिकाऱ्याविषयी - ग्रीन मॅन ऑफ लुधियाना

रोहित गेल्या ४ वर्षांपासून आपल्या क्षमतेनुसार वृक्षारोपण मोहीम राबवत आहेत. पंजाबच्या जवळपास प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी एक ग्रीन बेल्ट विकसित केला आहे. सोबतच सूरत, बडोदा, मुंबई आणि दिल्लीसह भारतातील इतर अनेक शहरांमध्येही त्यांनी मिनी जंगलाच्या रुपाने आपली हिरवी छाप सोडली आहे.

ग्रीन मॅन ऑफ लुधियाना
ग्रीन मॅन ऑफ लुधियाना

By

Published : Oct 30, 2020, 6:04 AM IST

लुधियाना (पंजाब) - लुधियानाचे रोहित मेहरा हे 'ग्रीन मॅन' नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांना हे नाव त्यांच्या पर्यावरणासाठी केलेल्या कार्याबद्दल देण्यात आले. त्यांनी देशभरात 75 हुन अधिक ग्रीन बेल्ट विकसित केले आहेत. त्यांच्याद्वारे विकसित केलेल्या ग्रीन बेल्टमध्ये 600 ते 700 झाडं आहेत. या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यात 8 लाखांहून अधिक झाडं लावली आहेत.

पर्यावरणाच्या संरक्षणासाठी झटत असलेला 'ग्रीन मॅन ऑफ लुधियाना'

रोहित मेहरा हे लुधियानामध्ये कर विभागत सहसंचालक पदावर कार्यरत आहेत. आपले कर्तव्य चोखपणे बजावताना त्यांनी पर्यावरणाविषयीचे प्रेमही तितकच जपल हे विशेष. रोहित गेल्या ४ वर्षांपासून आपल्या क्षमतेनुसार वृक्षारोपण मोहीम राबवत आहेत. पंजाबच्या जवळपास प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी एक ग्रीन बेल्ट विकसित केला आहे. सोबतच सूरत, बडोदा, मुंबई आणि दिल्लीसह भारतातील इतर अनेक शहरांमध्येही त्यांनी मिनी जंगलाच्या रुपाने आपली हिरवी छाप सोडली आहे.

शासकीय सेवेत अधिकारी पदावर काम करत असतानाही रोहित आपल्या कामातून वेळ काढत पर्यावरणाचे सौंदर्य संरक्षित करण्यासाठी हातभार लावत आहेत. देशभरात 1000 ग्रीन बेल्ट्स किंवा मिनी वने विकसित करण्याचा त्यांचा संकल्प आहे. उच्चपदस्थ सरकारी अधिकारी असूनही, रोहित यांचे निसर्गावर असलेले प्रेम कौतुकास्पद आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details