महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

व्हिसा नियम मोडणारे परदेशी नागरिक आता थेट काळ्या यादीत

अलीकडेच भारतात येऊन गेलेल्या किंवा भारतात आलेल्या विदेशी प्रवाशांनी जर नियमांचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे.

By

Published : Mar 31, 2020, 10:13 PM IST

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातेल आहे. चीनमध्ये उगम झालेला कोरोना विषाणू प्रवाशांमार्फत जगाच्या कानाकोपऱ्यात पसरला आहे. अलीकडेच भारतात येऊन गेलेल्या किंवा भारतात आलेल्या विदेशी प्रवाशांनी जर नियमांचे उल्लंघन केले तर, त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे.

जे प्रवासी नुकतेच भारतात आले होते. त्यातील ज्यांनी व्हिसा नियम आणि अटींचे उल्लंघन केले आहे, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यांना प्रवाशांच्या काळ्या यादीतही टाकण्यात येईल, असे केंद्रीय गृहसंचिव अजय भल्ला यांनी स्पष्ट केले आहे.

परदेशातून आलेले अनेक प्रवासी कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. 50पेक्षा जास्त विदेशी नागरिक कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. आज झारखंड राज्यात मलेशियन महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जर कोणी व्हिसा नियमांचे उल्लंघन केले असेल तर त्यांच्यावर गृहमंत्रालय कारवाई करणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details