नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोनाचे थैमान असून दररोज रुग्ण संख्येत वाढ होत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी जगभरामधील अनेक देशात कोरोना विषाणूवर लस विकसित करण्यात येत आहे. यात भारताचाही समावेश आहे. कोरोना लसीच्या वितरणासंदर्भात योग्य रणनीती न आखल्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
कोरोना लसीच्या वापरासाठी आणि वितरणासाठी निष्पक्ष आणि सर्वसमावेशक रणनीती आतापर्यंत तयार व्हायला हवी होती. मात्र, याबाबत अद्याप कोणतेच नियोजन सरकारने केले नसल्याचे पाहायला मिळत आहे. भारत सरकारचा हलगर्जीपणा चिंताजनक आहे, असे टि्वट राहुल गांधींनी केले आहे. या टि्वटला त्यांनी आपले 14 ऑगस्टचेही टि्वटही जोडले आहे.