महाराष्ट्र

maharashtra

संकटात दिलासा; सरकारकडून गरिबांना ५३ हजार २४८ कोटी रुपये वितरित

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 26 मार्चला आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. यामध्ये 1.7 लाख कोटी रुपये पंतप्रधान गरीब कल्याणसाठी देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.

By

Published : Jun 3, 2020, 2:53 PM IST

Published : Jun 3, 2020, 2:53 PM IST

ETV Bharat / bharat

संकटात दिलासा; सरकारकडून गरिबांना ५३ हजार २४८ कोटी रुपये वितरित

Representative
प्रतीकात्मक

नवी दिल्ली - केंद्र सरकारने 42 कोटी लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतर योजनेमधून 53 हजार 248 कोटी रुपये पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजमधून दिले आहेत. ही माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आज दिली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 26 मार्चला आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. यामध्ये 1.7 लाख कोटी रुपये पंतप्रधान गरीब कल्याणसाठी देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यामागे कोरोनाच्या संकटामुळे परिणाम झालेल्या कामगार आणि इतर घटक दुर्बल घटकांना दिलासा देणे, हा उद्देश आहे.

पॅकेजमध्ये मोफत धान्य व महिला, गरीबांना व शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा समावेश होता.

  • केंद्र सरकारने पंतप्रधान उज्वला योजनेतील लाभार्थ्यांच्या 8 हजार 448 कोटी रुपये जमा केले आहेत. तर उज्वला योजनेतील लाभार्थ्यांना 8. 58 कोटी मोफत सिलेंडर दिले आहेत. या योजनेमधील लाभार्थ्यांना 30 जूनपर्यंत तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याची सरकारने घोषणा केली आहे.
  • भविष्य निर्वाह निधीच्या 59. 23 लाख खातेदारांना 895 कोटींचे वितरण करण्यात आले आहे. सरकारने तीन महिन्यांसाठी पीएफचा 24 टक्के वाटा भरणार असल्याचे जाहीर केले होते.
  • पंतप्रधान किसान योजनेतील 8.19 कोटी शेतकऱ्यांना 16 हजार 394 कोटी रुपये खात्यावर देण्यात आले आहेत. यामधून या शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये खात्यावर मिळाले आहेत.
  • बँकेत जनधन खाते असलेल्या महिलांना 20 हजार 340 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तर 2.81 कोटी ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला आणि दिव्यांग यांच्या खात्यावर 2814 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.
  • याचबरोबर 2.3 कोटी इमारत आणि बांधकाम कामगारांना 4 हजार 313 कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे अनेकांना आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून विविध घटकांना आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details