श्रीनगर- कलम ३७० हटवले गेल्यानंतरची जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती जाणून घेण्यासाठी, परदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांचे आणखी एक शिष्टमंडळ काश्मीर दौरा करणार आहे. साधारणपणे महिनाभरापूर्वीच अमेरिका आणि नॉर्वे देशांच्या राजदूतांसह पंधरा राजनैतिक अधिकाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने जम्मू आणि काश्मीरला भेट दिली होती.
यावेळी जम्मू काश्मीरला भेट देणाऱ्या शिष्टमंडळात युरोपीय युनियन आणि आखाती देशांमधील राजनैतिक अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. युरोपीय संसदेत 'सीएए' आणि काश्मीर प्रकरणी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर, हा दौरा महत्त्वपूर्ण असणार आहे.