नवी दिल्ली -भाजपप्रणित केंद्र सरकारकडून मागासवर्गीय आरक्षणाला पुन्हा १० वर्षांची मुदतवाढ देणारे विधेयक सोमवारी संसदेत मांडले जाणार आहे. एससी-एसटी सारख्या मागास प्रवर्गांचे चालूचे आरक्षण तसेच कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद सोमवारी लोकसभेमध्ये हे विधेयक मांडणार आहेत. राज्यघटनेतील ३३४ कलमानुसार १२६ वी घटनादुरुस्ती विधेयक संसदेसह राज्यांच्या सभागृहातही मांडले जाणार आहे. विधेयकाला मंजूरी मिळाल्यानंतर १० वर्षे म्हणजे २५ जानेवारी २०३० पर्यंत आरक्षणाला वाढ मिळणार आहे. आरक्षण चालू ठेवण्याची शेवटची तारीख २६ जानेवारी २०२० आहे. त्यामुळे आरक्षण कायम ठेवायचे असल्यास या तारखेपूर्वी आरक्षण कायम केल्याचे विधेयक मंजूर होणे अपेक्षित असल्याने भाजपकडून हे विधेयक अधिवेशनात मांडले जाणार आहे.