नवी दिल्ली -औषधांचा तुटवडा जाणवू नये, यासाठी केंद्र सरकारने औषध उत्पादनाचा वेग वाढवण्याचे आदेश फार्मास्युटिकल कंपन्यांना दिले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच येणाऱ्या काळात औषधांची कमतरता रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
'अत्यावश्यक औषधांचे उत्पादन वाढवा'; केंद्र सरकारचे औषध कंपन्यांना निर्देश - Ministry of Environment, Forest and Climate Change
लॉकडाऊनच्या काळात औषधे आणि ड्रग्सचा तुटवडा होऊ नये, यासाठी केंद्र शासनाने औषध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये अत्यावश्यक मेडिसीन्सचा समावेश आहे. येणाऱ्या काळात औषधांची कमी भासू नये, यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, औषध उत्पादनांच्या प्रक्रियेत सातत्य राखण्यासाठी तसेच सुरळीत कार्यप्रक्रियेसाठी पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्रालयाने सूचना जारी केली आहे. वातावरण अधिनियम २००६ नुसार सर्व आजारांवर औषधे बनवणाऱ्या कंपन्यांना नव्याने वर्गीकरण करण्यात आलेल्या रोगांवरील आवश्यक मेडिसीन्सची यादी पाठवण्यात आली आहे. यानुसार पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या 'अ' वर्गाचा आता 'ब२' मध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे.
यातील 'ब' वर्गात मोडणाऱ्या बेसलाईन डेटामधून सवलत देण्यात आली आहे. यामुळे संबंधित वर्गात मोडणाऱ्या कंपन्यांना औषध उत्पादनाचा वेग वाढवता येणार असून गतीने उत्पादन करता येणार आहे. यासंबंधीच्या सूचना राज्य सरकारांना देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने अत्यावश्यक औषधांची उपलब्धता वाढवण्यासाठी संबंधित निर्णय घेतला आहे.