नवी दिल्ली - गांधी कुटुंबीयांमार्फत चालवण्यात येणाऱ्या राजीव गांधी फाऊंडेशन आणि इंदिरा गांधी ट्रस्ट यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार आहे. या ट्रस्टवर देशाबाहेरून येणाऱ्या देणग्यासंबंधी नियमावली मोडल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. तसेच यामध्ये मनी लाँडरींगचा देखील समावेश आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मंत्रिमंडळाचे विशेष पथक स्थापन होणार असून त्याचे नेतृत्व सक्तवसुली संचलनालय कार्यालयातील विशेष संचालक करणार आहेत. याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी माहिती दिलीय.
गांधी कुटुंबीयांना दणका, राजीव गांधी ट्रस्टला आलेल्या निधीची होणार चौकशी - rajiv gandhi foundation
गांधी कुटुंबीयांमार्फत चालवण्यात येणाऱ्या राजीव गांधी फाऊंडेशन आणि इंदिरा गांधी ट्रस्ट यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार आहे. गांधी कुटुंबीयांशी संबंधित ट्रस्टवर देशाबाहेरून येणाऱ्या देणग्यासंबंधी नियमावली मोडल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. तसेच यामध्ये मनी लाँडरींगचा देखील समावेश आहे.
गृहमंत्रालयाने गठीत केलेली अंतरिम मंत्रीमंडळाची समिती या सर्व कारवाईचे समन्वय करणार आहे. यामध्ये अनेक कायदेशीब बाबींचे उल्लंघन केल्याचे समोर आल्याने संबंधित कारवाई करत असल्याचे गृह खात्याच्या वतीने सांगण्यात आले. प्राप्तीकर कायद्यातील तरतुदींचे देखील उल्लंघन केल्याचा संशय व्यक्त होत आहे. यामध्ये राजीव गांधी फाऊंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट चा समावेश आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने ट्वीव केले आहे.