महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

काश्मीर खोऱ्यातील काही भांगामध्ये इंटरनेट सेवा सुरळीत - मोबाईल इंटरनेट सेवा

जम्मू, रेसाई, सांबा, कठुआ आणि उधमपूर क्षेत्रातील २ जी इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे.

काश्मीर

By

Published : Aug 17, 2019, 9:52 AM IST

Updated : Aug 17, 2019, 12:50 PM IST

श्रीनगर- जम्मू-काश्मीर खोऱ्यातील मोबाईल इंटरनेट सेवा टप्प्याटप्याने सुरू करण्यात येत आहे. जम्मू, रेसाई, सांबा, कठुआ आणि उधमपूर क्षेत्रातील २ जी इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे.

मुख्य सचिवांनी काल(शुक्रवारी) पत्रकार परिषदेमध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे सर्व सेवा टप्याटप्याने सुरू करण्यात येत आहेत. काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर राज्यामध्ये संचारबंदी लागू आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून मोबाईल आणि इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली होती. आता ती टप्प्याटप्याने सुरू करण्यात येत आहे.

काश्मीर खोऱ्यातील जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. सरकारी कार्यालये कालपासून सुरू झाली आहेत.

Last Updated : Aug 17, 2019, 12:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details