नवी दिल्ली - लॉकडाऊन, अर्थव्यवस्था, कोरोना, जीडीपी घसरण आदी मुद्यांवरू़न काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. आज पुन्हा राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला आहे. मोदी फक्त आपल्या मित्रांचे हित पाहत असून देशातील मुळ मुद्यांकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत मोदींवर सडकून टीका केली.
'मोदीजी तुमच्या खास मित्रांना सरकारी कंपन्या देणे बंद करा'
आज पुन्हा राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला आहे. मोदी फक्त आपल्या मित्रांचे हित पाहत असून देशातील मुळ मुद्यांकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
देशातील परिस्थितीची तुम्हाला जाणीव असून तुम्ही देशाचे भविष्य आहात. कोरोना विषाणूचे देशात संक्रमण होण्यापूर्वीच मी या संकटाबाबत केंद्र सरकारला सूचीत केले होते. मात्र, केंद्र सरकारने माझी चेष्टा केली. जेव्हा संक्रमण देशभर पसरले. तेव्हाही मी सरकारला न्याय योजना लागू करणं, लघू उद्योगांना मदत करणं, आदी उपाय दिले. मात्र, त्यांनी काही उपाय न करता, आपल्या काही खास मित्रांचे लाखो-कोटी रुपयांचे कर्ज माफ केले, असे राहुल गांधी व्हिडिओमध्ये म्हणाले.
मोदींनी देशाच्या तरुणांचे आयुष्य उद्धवस्त केले आहे. मात्र, अजुनही वेळ गेली नसून, तुम्ही मी सुचवलेले उपाय लागू करू शकता. तसेच आपल्या मित्रांना सरकारी कंपन्या सोपवण्याच काम तुम्ही करत आहात. ते थांबवा. तुम्ही देशाचे पंतप्रधान असून देश तुमच्याकडे आशेनं पाहत आहे. मुळ मुद्यांवर भाष्य करा, असे राहुल गांधी म्हणाले.