नवी दिल्ली - कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे, अनेक व्यावसायांना याचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. अशात जेव्हा आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहे, तेव्हा सरकारने काहीतरी पॅकेज जाहीर करणे अपेक्षित आहे.
लॉकडाऊनमुळे आर्थिक व्यवहार ठप्प, सरकार आर्थिक पॅकेजची करणार घोषणा !
शुक्रवारी सरकार मोठ्या आर्थिक पॅकेजची घोषणा करणार असल्याची शक्यता आहे. हे पॅकेज काही ठराविक काळासाठी असणार आहे. सोबतच काही सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले, की एकच मोठे पॅकेज जाहीर करण्यापेक्षा सरकार महत्त्वाच्या मतदारसंघांना लक्षात घेऊन त्यानुसार हे पॅकेज जाहीर करत आहे.
शुक्रवारी सरकार मोठ्या आर्थिक पॅकेजची घोषणा करणार असल्याची शक्यता आहे. हे पॅकेज काही ठराविक काळासाठी असणार आहे. सोबतच काही सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले, की एकच मोठे पॅकेज जाहीर करण्यापेक्षा सरकार महत्त्वाच्या मतदारसंघांना लक्षात घेऊन त्यानुसार हे पॅकेज जाहीर करत आहेत. यासाठी ११.२ लाख कोटींचे प्रोत्साहन पॅकेज जाहीर केले जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
एक्यूट रेटिंग्सच्या अहवालानुसार काही राज्याची आर्थिक स्थिती ही इतर राज्यांच्या तुलनेत चांगली आहे. यात कर्नाटक, महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात, हरियाणा आणि तेलंगणा या राज्यांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यांची आर्थिक परिस्थिती पाहून हे पॅकेज जाहीर केले जाऊ शकते.