नवी दिल्ली -आपले सरकार गरीब आहे, त्यामुळे अधिक पैशांसाठी कर वाढवावा लागत आहे; असे म्हणत चिदंबरम यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ट्विट करत पेट्रोल दरवाढीबाबत आपला रोष व्यक्त केला आहे.
दोन आठवड्यांपूर्वी करवाढ केल्यानंतर, आता दोनच दिवसांमध्ये तेलाचे दर दुसऱ्यांदा वाढवण्यात आले आहेत. केवळ तेल कंपन्यांना फायदा व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे चिदंबरम यांनी म्हटले आहे. सरकार गरीब आहे, म्हणून त्यांना पैसे हवेत. तेल कंपन्या गरीब आहेत, म्हणून त्यांना पैसे हवेत. केवळ देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय जनता गरीब नाहीये, त्यामुळे त्यांच्या खिशातून ही रक्कम वसूल केली जात आहे; असा उपरोधिक टोला त्यांनी केंद्राला लगावला आहे.