नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी सैन्य उपकरणे व हार्डवेअरसाठीचा पुरवठा कालावधी चार महिन्यांपर्यंत वाढविला आहे. यामध्ये फक्त भारतीय पुरवठादारांशी केलेल्या भांडवल संपादन कराराचा समावेश असेल.
संरक्षण उत्पादनाच्या पुरवठ्यासाठी कंपन्यांना सरकारकडून आणखी चार महिन्यांची मुदतवाढ
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी सैन्य उपकरणे व हार्डवेअरसाठीचा पुरवठा कालावधी चार महिन्यांपर्यंत वाढविला आहे.
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केले होते. यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. म्हणून चार महिन्यांची मुदत देण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
विदेशी पुरवठादार असलेल्या कंपन्यांनी संरक्षण मंत्रालयाशी संपर्क साधवा. संबंधित देशाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यावर स्वतंत्रपणे विचार केला जाईल. पुरवठा कालावधी पुढे नेण्याचा फायदा फक्त 25 मार्च ते 24 जुलै 2020 दरम्यान पुरवठा करणार्याना कंपन्यांनाच देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.