महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कांदा निर्यातीवर केंद्र सरकारची बंदी, सर्व प्रकारच्या कांद्यांचा समावेश

कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण मिळवणे आणि किरकोळ बाजारातील कांद्याची उपलब्धता वाढण्याचा या निर्यात बंदी पाठीमागचा हेतू असल्याचे सांगण्यात येत आहे. देशातील सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे.

कांदा निर्यातीवर केंद्र सरकारची बंदी
कांदा निर्यातीवर केंद्र सरकारची बंदी

By

Published : Sep 15, 2020, 3:02 AM IST

नवी दिल्ली - केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणली आहे. देशातील कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण मिळवणे आणि किरकोळ बाजारातील कांद्याची उपलब्धता वाढण्याचा त्यापाठीमागचा हेतू असल्याचे सांगण्यात येत आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर त्वरीत बंदी घालण्यात आली आहे.

या अधिसूचनेनुसार सर्व प्रकारच्या कांद्यावर निर्यात बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी टीका केली आहे. आज कांद्यावर केंद्र सरकारने निर्यात बंदी घातली. काही दिवसांपूर्वी याच केंद्र सरकारकडून कांदा नियंत्रणमुक्त केला व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय दिला, असा ढोल वाजविला गेला आणि आता वेळ येताच दलालांना पैसे मिळावेत म्हणून केंद्र सरकारने आज पुन्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांविरोधी हा तुघलकी निर्णय घेतला आहे. या बांडगुळांना पोसण्यासाठी शेतकऱ्यांप्रति बेगडी प्रेम दाखवून अजून किती दिवस शेतकऱ्यांचा बळी घेणार आहात? असा प्रश्न त्यांनी केंद्र सरकारला केला आहे.

हेही वाचा -आग्र्याच्या मुघल संग्रहालयाचे नाव बदलले, आता होणार 'छत्रपती शिवाजी महाराज'

देशाची राजधानी नवी दिल्लीत सध्या कांदा ४० रुपये किलो दराने विकला जात आहे. कोरोना विषाणूच्या संकटात गेल्या काही महिन्यांत कांदा मोठ्या प्रमाणात निर्यात केला गेला. कांद्याची सर्वाधिक निर्यात भारतातून बांगलादेश, मलेशिया, युएई आणि श्रीलंका येथे केली जाते.

ABOUT THE AUTHOR

...view details