नवी दिल्ली- देशभरातील पूरपरिस्थितीमुळे कांद्याच्या उत्पादनात घट झाली असून, त्याचा थेट परिणाम कांद्याच्या दरांवर झाला आहे. ऐन सणासुदीच्या काळात कांद्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत.
कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारचे मोठे निर्णय... - कांदा निर्यात
साठेबाजीला आळा बसून बाजारपेठेमध्ये कांदा उपलब्ध व्हावा, यासाठी कांदा साठवून ठेवण्यावर काही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. किरकोळ व्यापाऱ्यांवर जास्तीत जास्त १०० क्विंटल आणि घाऊक व्यापाऱ्यांवर जास्तीत जास्त ५०० क्विंटल साठा करण्याची मर्यादा घालण्यात आली आहे.
त्यामुळे कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने दोन निर्णय घेतले आहेत. यामधील पहिला निर्णय म्हणजे, कांद्याच्या निर्यातीवर सरकारने बंदी आणली आहे. तर, साठेबाजीला आळा बसून, बाजारपेठेमध्ये कांदा उपलब्ध व्हावा यासाठी कांदा साठवून ठेवण्यावर काही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. किरकोळ व्यापाऱ्यांवर जास्तीत जास्त १०० क्विंटल आणि घाऊक व्यापाऱ्यांवर जास्तीत जास्त ५०० क्विंटल साठा करण्याची मर्यादा घालण्यात आली आहे.
कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने आज दुपारी घेतला होता. तात्काळ या निर्णयाची अंमलबजावणी लागू होईल असेही ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने स्पष्ट केले होते. यानुसार, किमान निर्यात दराच्या खाली नोंदवलेली बांगलादेश आणि श्रीलंकेतील निर्यात तात्काळ थांबवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. याचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही सरकारने दिला आहे.