नवी दिल्ली - चिनी सैन्याशी झालेल्या चकमकीत सैनिकांच्या मृत्यूमुळे संपूर्ण देशात संताप आहे. अशा वेळी एकता आणि परिपक्वता दर्शवित सरकार आणि विरोधी पक्षांनी एकत्र काम केले पाहिजे, असे बहुजन समाज पक्षाच्या सुप्रीमो मायावती यांनी म्हटले आहे.
चीनविरोधात सरकार अन् विरोधी पक्षांनी एकत्र काम करावे - मायावती - बसपा नेत्या मायावती
चिनी सैन्याशी झालेल्या चकमकीत सैनिकांच्या मृत्यूमुळे संपूर्ण देशात संताप आहे. अशा वेळी एकता आणि परिपक्वता दर्शवित सरकार आणि विरोधी पक्षांनी एकत्र काम केले पाहिजे, असे बहुजन समाज पक्षाच्या सुप्रीमो मायावती यांनी म्हटले आहे.
मायावती
अलीकडेच, 15 जून रोजी लडाखमध्ये चिनी सैन्यासह झालेल्या संघर्षात 20 भारतीय जवानांच्या मृत्यूमुळे संपूर्ण देश दु:खी आहे. यासाठी सरकार आणि विरोधी पक्ष या दोघांनाही पूर्ण परिपक्वतेसह एकत्रपणे कार्य करावे. जे देशाच्या हिताचे असले, असे मायावती यांनी म्हटलं आहे.
अशा कठीण आणि आव्हानात्मक काळात पुढील कारवाईसंबधित देशातील लोकांची मते ही भिन्न असू शकतात. राष्ट्रीय हित आणि सीमेचे रक्षण करण्याची ही जबाबदारी सर्वांचीच आहे, असे त्या म्हणाल्या.