नवी दिल्ली - दिल्लीतील विज्ञान भवनात सुरू असलेली शेतकरी आणि कृषीमंत्र्यांची बैठक संपली असून अद्यापही बैठकीत अंतिम तोडगा निघालेला नाही. आता ५ डिसेंबरला पुन्हा बैठक होणार आहे. मात्र, बैठक सकारात्मक झाली असून आणखी बरीच चर्चा राहिल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले. किमान आधारभूत किमतींना हात लावू नये, ही एक शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. त्यावर सरकार मवाळ होत असल्याचेही नेत्यांनी सांगितले.
काय म्हणाले शेतकरी नेते
विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. आता ५ तारखेला अंतिम तोडगा निघावा, अशी आशा आहे. सुमारे ७ तास बैठक चालली. मात्र, उशीर झाल्याने बैठक आटोपती घेतली. किमान आधाभूत किमतींबाबत सरकार मवाळ होत असल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले. चर्चा आणखी लांबण्याची शक्यता बैठकीत सहभागी झालेल्या एका नेत्याने व्यक्त केली.