महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मनोहर पर्रीकर प्रज्ञावंत,सुसंस्कृत, द्रष्टे राजकारणी- राज्यपाल विद्यासागर राव - governor c vidyasagar rao

राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मनोहर पर्रीकर हे समकालीन राजकारणातील अतिशय प्रज्ञावंत, सुसंस्कृत आणि द्रष्टे राजकरणी होते असे राव यांनी म्हटले आहे. त्यांनी पर्रीकर यांना आदरांजली वाहिली आहे.

मनोहर पर्रीकर

By

Published : Mar 17, 2019, 10:10 PM IST

मुंबई -गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांच्या मृत्यूने देशाच्या राजकारणाची मोठी हानी झाली आहे. सध्याच्या राजकारणात सुसंस्कृत राजकारण्यांची संख्या बोटांवर मोजण्याइतकीच राहिलीआहे. 'सत्तेसाठी काहीही' सुरू झाल्याने राजकारणी आणित्यांचे राजकारण यांचा दर्जा ढासळल्याचे दिसत आहे.या प्रवाहात वेगळा उठून दिसणारा नेता हरपल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मनोहर पर्रीकर हे समकालीन राजकारणातील अतिशय प्रज्ञावंत,सुसंस्कृत आणि द्रष्टे राजकरणी होते असे राव यांनी म्हटले आहे.त्यांनी पर्रीकर यांना आदरांजली वाहिली आहे.

गोव्याचे विरोधी पक्षनेते,मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी प्रामाणिकपणा व सचोटीने कर्तव्य बजावले. त्यांना विकासाची दृष्टी होती आणि सामान्य जनतेच्या हिताची तीव्र कळकळ होती. मितभाषी असलेल्या पर्रीकर यांचे सर्व पक्षातील लोकांशी सलोख्याचे संबंध होते. अखेरपर्यंत कार्यशील राहणार्‍या पर्रीकर यांचे जीवन हा लोकसेवेला समर्पित कर्मयज्ञ होता. त्यांच्या निधनामुळे राजकारणातील एक दैदीप्यमान तारा निखळला आहे, या शब्दात राज्यपाल विद्यासागर राव यांनी पर्रीकर यांच्याप्रती आपली शोकसंवेदना व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details