भोपाळ - राज्यामध्ये उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हालचाली करण्यात सुरुवात केली आहे. राजधानी क्षेत्रामध्ये काही नवे उद्योग स्थापन करण्यात येणार आहेत. त्याासाठी भारत हेवी इलेक्ट्रीकल्स लिमिटेड(भेल) या सरकारी उपक्रमाकडून वापरात नसलेली १ हजार १६४ एकर जमीन राज्य सरकार माघारी घेणार आहे.
भारत हेवी इलेक्ट्रीकल्सची सुमारे १,१०० एकर जमीन मध्यप्रदेश सरकार माघारी घेणार - भारत हेवी ईलेक्ट्रीकल्स लिमीटेड
अनेक वर्षांपासून ही जमीन भेल कंपनीकडे पडून आहे. त्यातील काही जमीनीवर अतिक्रमणही होत आहे, त्यामुळे जमीन माघारी घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
अनेक वर्षांपासून ही जमीन भेल कंपनीकडे पडून आहे. त्यातील काही जमीनीवर अतिक्रमणही होत आहे, त्यामुळे जमीन माघारी घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जमीन ताब्यात घेण्यासाठीचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी भोपाळ जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
भेल उपक्रमाकडून सध्या ३ हजार १२१ एकर जमीन वापरात आहे. इतर जमीन विनावापर पडून आहे. याआधी भेलने ६११ एकर जमीन विविध कंपन्यांना दिली आहे. मात्र, अजूनही जमीनीचे हस्तांतरण झाले नाही. त्यामुळे जमीन हस्तांतरीत करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केला आहे.