जयपूर(राजस्थान) - कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र, लॉकडाऊन असूनदेखील राज्यातील शासकीय कार्यालये २० एप्रिलपासून उघडली जाणार आहेत.
राज्याच्या प्रशासकीय सुधार विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव आर. व्यंकटेश्वरण यांनी दिलेल्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांना रोटेशननुसार काम करावे लागेल, तसेच उर्वरीत कर्मचारी घरून काम करणार. गरज भासल्यास त्यांना कार्यालयात बोलवण्यात येईल. लॉकडाऊनच्या काळात सर्व अधिकारी आणि कर्मचारी मुख्य कार्यालयातच राहतील. ते कार्यालय सोडून जाऊ शकणार नाहीत.