नवी दिल्ली - केंद्र सरकारने कोरोना आणिबाणी हातळण्यासाठी 15 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. कोरोना आणिबाणीमुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्र सरकारने निधी मंजूर केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
कोरोना आणिबाणी हाताळण्यासाठी केंद्र सरकारने 15 हजार कोटी केले मंजूर
भारतामध्ये आत्तापर्यंत कोरोनाचे 5 हजार 734 रुग्ण आढळून आले आहेत. मागील 24 तासात 549 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
कोरोना संग्रहित छायाचित्र
भारतामध्ये आत्तापर्यंत कोरोनाचे 5 हजार 734 रुग्ण आढळून आले आहेत. मागील 24 तासात 549 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 166 जण दगावले आहेत. केरळ, महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडू राज्यामध्ये सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.
5 हजार 95 केसेस अॅक्टिव्ह असून 472 जण पूर्णत: बरे झाले आहेत. महाराष्ट्रात 1 हजार 300 पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. त्याखालोखाल तामिळनाडूत 738 रुग्ण आढळून आले आहेत. दिल्लीमध्ये 669 रुग्ण आढळून आले आहेत.