नवी दिल्ली - देशभरामध्ये 21 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी घराबाहेर न पडणे हाच एकच उपाय असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. मात्र, जीवनावश्यक वस्तूंसाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे आता औषधे घरपोच (होम डिलिव्हरी) करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.
आता गोळ्या-औषधांचीही मिळणार होम डिलिव्हरी!
होम डिलिव्हरी करण्यास परवानगी देण्यात आली असून याची माहिती पत्रकाद्वारे देण्यात येणार आहे. देशभरामध्ये लॉकडाऊन असले तरी अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने सुरू आहेत.
होम डिलिव्हरी करण्यास परवानगी देण्यात आली असून याची माहिती पत्रकाद्वारे देण्यात येणार आहे. देशभरामध्ये लॉकडाऊन असले तरी अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने सुरू आहेत. भाजीपाला, किराणा माल आणि औषधांचा यामध्ये समावेश आहे. आता औषधांसाठी नागरिकांना मेडिकलमध्ये न जाता घरपोच औषधे मिळण्याची सोय झाली आहे.
मास्क आणि इतर उपकरणांचा मेडिकल दुकानदार साठेबाजी करत असल्याचेही समोर आले आहे. पोलिसांनी अनेक ठिकाणी धाडी टाकत मास्कचा साठा जप्त केला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने औषधांची होम डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात कोरोनाचे रुग्ण 600 च्या पुढे गेले आहेत. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना पोलीस चांगलेच फटके देत आहेत.