नवी दिल्ली - केंद्र सरकारने जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते फारुक अब्दुल्ला यांची अखेर सुटका केली आहे. यासंबधीचा अधिकृत आदेश जम्मू-काश्मीर सरकारने जारी केला आहे. गेल्या वर्षी 5 ऑगस्टपासून फारूक अब्दुला नजरकैदेत होते.
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांची 7 महिन्यानंतर सुटका...
केंद्र सरकारने जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते फारुक अब्दुल्ला यांची अखेर सुटका केली आहे.
जम्मू-काश्मीरचे ३ वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या ८३ वर्षीय फारूक यांना त्यांच्या घरीच नजरकैदेत ठेवण्यात आले होते. 16 सप्टेंबरला त्यांच्यावर सार्वजनिक सुरक्षा कायदा (PSA) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. या कायद्याअंतर्गत सरकार कोणत्याही व्यक्तीला कोणताही खटला न चालवता दोन वर्षांपर्यंत नजरकैदेत ठेऊ शकतं.
5 ऑगस्टला जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल ३७० हटवण्यात आले. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती यांच्यासह शेकडो काश्मिरी नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. दरम्यान माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती यांच्यावर अद्याप नागरी सुरक्षा कायद्या अंतर्गत कारवाई सुरु आहे.