महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

व्हॉट्सअॅप हेरगिरी प्रकरण : 'नागरिकांच्या स्वातंत्र्याचं रक्षण करण्यास सरकार कटीबद्ध' - Ravi Shankar Prasad

व्हॉट्सअॅपच्या हेरगिरीप्रकरणी गृह मंत्रालयालकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप हेरगिरी प्रकरण : 'नागरिकांच्या स्वातंत्र्याचं रक्षण करण्यास सरकार कटीबद्ध'

By

Published : Oct 31, 2019, 10:14 PM IST

नवी दिल्ली -व्हॉट्सअॅपच्या हेरगिरीप्रकरणी गृह मंत्रालयालकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. नागरिकांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचे हनन केल्याचे विरोधकांनी सरकारवर केलेले आरोप अर्थहीन आहेत. हा सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे असे गृह मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले.


व्हॉट्सअॅपवर भारतीय नागरिकांचे व्यक्तिगत स्वातंत्र्याचे उल्लघंन केल्यासंबधी काही माहिती समोर आली आहे. भारतीयांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचं रक्षण करण्यास सरकार कटीबद्ध आहे. नागरिकांच्या गोपनीयतेच्या उल्लंघनास जबाबदार असणाऱ्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल. सरकारने कायद्यातील तरतुदीनुसार काटेकोरपणे कार्य केले असून प्रोटोकॉलचे अनुसरण केले आहे, असे गृहमंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे.

व्हॉट्सअॅपच्या हेरगिरीप्रकरणी गृह मंत्रालयालकडून स्पष्टीकरण...


सरकारने व्हॉट्सअ‍ॅपकडे मागितले स्पष्टीकरण -
भारत सरकारच्या माहिती व दूरसंचार मंत्रालयाने ४ नोव्हेंबरपर्यंत व्हॉट्सअॅपला याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. इस्रायलच्या स्पायवेअर पिगाससच्या माध्यमातून भारतीय पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांची हेरगिरी करण्यात आल्याचे व्हॉट्सअॅपकडून सांगण्यात आले होते.


काय आहे व्हॉट्सअॅप हेरगिरी प्रकरण?
इस्रायलच्या स्पायवेअर पिगासस भारतामध्ये सक्रिय होता. इस्राईलमधील एनएसओ ग्रुपने तंत्रज्ञानाचा वापर करत जगभरातील १ हजार ४०० लोकांच्या स्मार्टफोनला लक्ष्य केल्याचे व्हॉट्सअॅपने म्हटले आहे. यामध्ये राजकीय विरोधक, पत्रकार आणि सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मात्र, यामध्ये कोणत्या पत्रकार आणि कार्यकर्त्यांचा समावेश हे कंपनीने जाहीर केले नाही.


विरोधकांची सरकारवर टीका-
फेसबुकच्या मालकी असलेल्या व्हॉट्सअॅपने भारतीय पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यासाठी इस्राईलची कंपनी स्पायवेअरचा वापरत असल्याचे सांगितल्यानंतर काँग्रेसने सरकावर निशाणा साधला आहे. याप्रकरणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सुप्रीम कोर्टाला या प्रकरणाची दखल घेण्याची विनंती टि्वटच्या माध्यमातून केली आहे.


दरम्यान व्हॉट्सअॅपने कॅलिफॉर्नियाच्या केंद्रीय न्यायालयात एनएसओ ग्रुपविरोधात दाखल केला आहे. टोरोंटो विद्यापीठामधील सिटीजन लॅबने हॅकिंग प्रकार उघडण्यासाठी व्हॉट्सअॅपला मदत केली आहे.व्हॉट्सअॅपचे जगभरात १.५ अब्ज वापरकर्ते आहेत. यामध्ये भारतामध्ये ४ कोटी वापरकर्ते आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details