महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राम नाईक यांना उत्तरप्रदेशच्या राज्यपाल पदावरुन हटवले; आनंदीबेन पटेलांची वर्णी - नवी दिल्ली

उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्याजागी मध्यप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बिहारमध्ये फागु चौहान नवे राज्यपाल म्हणून काम पाहणार आहेत.

राम नाईक

By

Published : Jul 20, 2019, 1:52 PM IST

नवी दिल्ली - उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्याजागी मध्यप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, बिहारचे राज्यपाल लालजी टंडन यांनी मध्यप्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, बिहारमध्ये फागु चौहान नवे राज्यपाल म्हणून काम पाहणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमध्येही राज्यपाल बदलण्यात आला आहे. जगदीप धनखर यांची पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, त्रिपुरामध्ये रमेश बैस, नागालँडमध्ये आरएन रवि यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details