सिवनी - मध्यप्रदेशमधील सीवनी येथील गोरक्षकांच्या गुंडगिरीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये गोरक्षकांनी दोन युवकांसह एका महिलेला बेदम मारहाण केली आहे. त्या युवकांनी गोमांस बाळगल्याच्या संशयावरून गोरक्षकांनी त्यांना बेदम मारहाण केली आहे. तसेच त्यांना जय श्रीरामच्या घोषणाही द्यायला लावल्या.
गोरक्षकांची गुंडगिरी, बघा २ युवकांसह महिलेला मारहाण करतानाचा व्हिडिओ - madhya pradesh
मध्यप्रदेशमधील सीवनीमध्ये गोरक्षकांनी गुंडगिरी केलेला एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये गोरक्षकांनी दोन युवकांसह एका महिलेला बेदम मारहाण केली आहे.

मध्य प्रदेशमध्ये गोरक्षकांची गुंडागर्दी
मध्य प्रदेशात गोरक्षकांची गुंडगिरी
मारहाण केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. दोन दिवसांपूर्वी गोरक्षकांनी दोन तरुण आणि एका महिलेला गोमांस बाळगल्याच्या संशयावरून पकडले होते. यासंदर्भात पोलिसांना माहिती न देताच गोरक्षकांनी युवकांना मारहाण केली. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या गोरक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Last Updated : May 25, 2019, 12:44 PM IST