नवी दिल्ली - भारताच्या 71 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलने डुडलच्या माध्यमातून भारतवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. गुगलच्या होमपेजवरील डुडलवर भारतातील महत्वाचे सण,उत्सव आणि संस्कृती दाखवण्यात आली आहे.
गुगलने डुडलच्या माध्यमातून भारताची विविधतेने नटलेली संस्कृती साकारली आहे. सिंगापूरमधील आर्टिस्ट मेरू सेठ यांनी आजचे प्रजासत्ताक दिन विशेष डुडल तयार केले आहे. भारतातील महत्वाचे सण उत्सव तसेच विशेष व्यक्तींवर गुगलकडून खास डुडल तयार करण्यात आले आहे. ऐतिहासिक ताजमहाल आणि इंडियागेट यांच्यासह ,संगीत कलेचा वारसा, सण उत्सव, शेती विविध राज्यामधील संस्कृती गुगलने डूडलच्या माध्यमातून दाखवली आहे.