नवी दिल्ली - गुगल सर्च इंजिन हे नेटकऱ्यांचे लाडके शोध साधन आहे. आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग असलेल्या सर्च इंजिन गुगलने आज 'विंटर सोलस्टाइस 2019' हे आपले डुडल बनवले आहे. आजच्या दिवशी दिवस हा सर्वात लहान आणि रात्र मोठी असते.
हेही वाचा -आयुष्मान भारत : पुढचा मार्ग खडतर
हॅप्पी विंटर! गूगलने तयार केलं 'विंटर सोलस्टाइस'2019' हे खास डूडल - स्नौमॅन डुडल
सर्च इंजिन गुगलने आज 'विंटर सोलस्टाइस 2019' हे आपले डुडल बनवले आहे. आजच्या दिवशी दिवस लहान आणि रात्र मोठी असते.
आजच्या या डुडलमध्ये एक स्नोमॅनपाहायला मिळत असून त्यावर क्लिक केल्यावर 'हॅप्पी विंटर', असे लिहून येत आहे. डुडलच्या माध्यमातून गुगलने हिवाळी हंगाम 2019 च्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुगलकडून दरवर्षी या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे हिवाळी हंगामावर डुडल बनवण्यात येते.
हेही वाचा -१०० वर्ष जुन्या पक्षाचे नेते देशातील हिंसेवर मौन बाळगून आहेत, मोदींचा काँग्रेसला टोला
वर्षातील सगळ्यात लहान दिवसाला इंग्रजीमध्ये विंटर सोलस्टाइस असे म्हटले जाते. आज दिवसाचे खास महत्व आहे. आज दिवस हा सर्वांत लहान आणि रात्र मोठी असते. आज पासून उत्तरायणाला सुरुवात होते. सोलस्टाइस हा एक लॅटिन शब्द आहे.