महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बँक ऑफ बडोदाच्या लॉकरमधून कोट्यवधींच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी

यूपीची राजधानी लखनौमध्ये बँक ऑफ बडोदाच्या लॉकरमधून 200 ग्राम सोन्याचे दागिने चोरी झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. चालु बाजारभावाप्रमाणे याची किंमत सुमारे एक कोटी सांगितली जात आहे.

bank-of-baroda
बँक ऑफ बडोदा

By

Published : Nov 21, 2020, 7:46 PM IST

लखनौ - शहरातील खुनजी रस्त्यावरील बँक ऑफ बडोदाच्या एका लॉकरमधून जवळपास 200 ग्राम सोन्याचे दागिने व नाणी चोरी झाली आहेत. याची किंमत एक कोटी रुपये सांगितली जात आहे. लॉकर मालक लॉकरमधील सामान आणण्यासाठी बँकेत आले त्यावेळी ही घटना लॉकरधारक व बँकेला समजली. या घटनेची पोलिसात नोंद झाली आहे.

काय आहे प्रकरण -
अमित प्रकाश बहादुर यांनी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की लॉकरमध्ये कुटूंबाचे दागिने व सोन्याची नाणी ठेवली होती. सामान चोरी झाल्यानंतर त्याचवेळी बँकेत तक्रार दाखल केली होती. बँकेने २६ ऑक्टोबरला येण्यास सांगितले होते. त्या तारखेला पोहोचल्यानंतर बँकेने पोलिसांत तक्रार करण्यास सांगितले. अमित सध्या बंगळुरूमध्ये नोकरी करतात. त्यांच्याबरोबर त्यांचे वडील डॉ. रविंद्र बहादुर आणि आई पुष्पा बहादुर यांचे संयुक्त खाते बँक ऑफ बडोदा येथे आहे.

23 ऑक्टोबरला त्यांचे आई-वडील बँक लॉकरमधून काही सामान काढायला गेले होते. नियमांप्रमाणे लॉकर इन्चार्ज स्वाती त्यांच्याबरोबर लॉकर रूममध्ये गेली. स्वातीने लॉकरला चावी लावली मात्र ती लागली नाही. कसेतरी करून त्यांनी लॉकर खोलले तर आतील सोन्याचे दागिने व सोन्याची नाणी गायब होती.

ABOUT THE AUTHOR

...view details