महाराष्ट्र

maharashtra

पाटणा रेल्वे स्थानकातून 5 कोटींचे सोने अन् 27 लाखांची चांदी जप्त, दोन एक्सप्रेस रेल्वेतील कारवाई

By

Published : Oct 10, 2020, 8:09 PM IST

पाटणा रेल्वे स्थानकात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या रेल्वे तपासणी मोहिमेत शालिमार एक्सप्रेसमधून 5 कोटीचे सोने तर श्रमजीवी एक्सप्रेसमधून 27 लाखांची चांदी जप्त करण्यात आली आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पाटणा (बिहार) -पाटणा रेल्वे स्थानकावर 5 कोटी रुपये किंमतीचे सोने व 27 लाख रुपये किंमतीची चांदी जप्त करण्यात आली आही. सोने शालीमार एक्सप्रेसमधून जीआरपीच्या पथकाने जप्त केले आहे. तर चांदी श्रमजीवी एक्सप्रेसमधून सीआरपीएफच्या पथकाने जप्त केली आहे.

बिहारमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सर्वत्र तपासणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पाटणा जंक्शन रेल्वे स्थानकात शालीमार एक्सप्रेसमध्ये जीआरपीच्या (शासकीय राखीव पोलीस) पथकाला तपासणी दरम्यान तब्बल 5 कोटींचे सोने जप्त करण्यात आले आहे. तर श्रमजीवी एक्सप्रेसमध्ये तपासणी करत असताना सीआरपीएफच्या पथकाला 27 लाख रुपये किंमतीची चांदी आढळली आहे.

हेही वाचा -गृह मंत्रालय ने महिला सुरक्षा को लेकर राज्यों को जारी की सलाह

ABOUT THE AUTHOR

...view details