हैदराबाद- पाकिस्तानला मदत करण्यासाठी अफवा पसरवत असल्याच्या आरोपावर एमआयएम प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. केंद्र सरकार लोकांची दिशाभूल करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मला वाटते की एकेदिवशी मलाही गोळी मारण्यात येईल. गोडसेची औलाद माझ्यासोबत असे करु शकते. देशात अजूनही गोडसेंच्या औलादी आहेत, अशी कडवट टीका ओवैसी यांनी केली आहे.
देशातली गोडसेंची औलाद एकेदिवशी मला गोळी घालेल - असदुद्दीन ओवैसी - असदुद्दीन ओवैसींची भाजपवर टीका
एकेदिवशी मला गोळी मारण्यात येईल. गोडसेची औलाद माझ्यासोबत असे करु शकते. देशात अजूनही गोडसेच्या औलादी आहेत, अशी कडवट टीका ओवैसी यांनी केली आहे.
ओवैसी यांनी जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढण्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकारला काश्मीरींबाबत प्रेम नसून त्यांच्या जमीनीवर प्रेम आहे. मी खासदार असलो तरी मला अरुणाचल प्रदेश आणि लक्षद्वीपमध्ये जाता येते का? या प्रदेशात प्रवेश करण्यासाठी मला परवानगी घ्यावी लागते. आसाममधल्या अनुसूचित प्रदेशात मी जागा घेऊ शकत नाही. मी नागालँड, मिझोराम, मणिपूर, आसाम आणि हिमाचल प्रदेशच्या नागरिकांना सांगू इच्छीतो की, त्यांच्या इथेही असेच होणार आहे, असे ओवैसी म्हणाले आहेत.
जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढल्यावरुन विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकारची ही कृती असंवैधानिक असल्याचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.