महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'नरेंद्र मोदी आणि गोडसेची विचारधारा सारखीच, मात्र मोदींमध्ये हे मान्य करण्याचे धाडस नाही'

वायनाडमध्ये संविधान वाचवा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी मोदींवर कडाडून टीका केली. नथुराम गोडसेने महात्मा गांधींना गोळी मारली, कारण त्याला स्वतःवर विश्वास नव्हता, त्याचा इतर कोणावरही विश्वास नव्हता, त्याचे केवळ स्वतःवर प्रेम होते. आपले पंतप्रधानही तसेच आहेत, तेही केवळ स्वतःवर प्रेम करतात, आणि केवळ स्वतःवर विश्वास ठेवतात, असे राहुल म्हटले.

Godse and Modi Shares same ideology says Rahul Gandhi
'नरेंद्र मोदी आणि गोडसेची विचारधारा सारखीच, मात्र मोदींमध्ये हे मान्य करण्याचे धाडस नाही'

By

Published : Jan 30, 2020, 12:52 PM IST

तिरूवअनंतपुरम - नरेंद्र मोदी आणि नथुराम गोडसे हे एकाच विचारधारेचे आहेत. त्या दोघांमध्ये काहीही फरक नाही. मात्र, मोदींमध्ये हे मान्य करण्याचे धाडस नसल्याचे म्हणत राहुल गांधी यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. ते केरळमधील वायनाड या त्यांच्या मतदारसंघात बोलत होते.

वायनाडमध्ये संविधान वाचवा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी मोदींवर कडाडून टीका केली. नथुराम गोडसेने महात्मा गांधींना गोळी मारली, कारण त्याला स्वतःवर विश्वास नव्हता, त्याचा इतर कोणावरही विश्वास नव्हता, त्याचे केवळ स्वतःवर प्रेम होते. आपले पंतप्रधानही तसेच आहेत, तेही केवळ स्वतःवर प्रेम करतात, आणि केवळ स्वतःवर विश्वास ठेवतात, असे राहुल म्हटले.

यावेळी बोलताना त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यावरही टीका केली. जेव्हा कधी तुम्ही मोदींना बेरोजगारी आणि नोकऱ्यांसंबंधी विचाराल, तेव्हा ते तुमचे लक्ष दुसऱ्या मुद्द्यांकडे वळवतात. एनआरसी आणि सीएएमुळे आपल्याला रोजगार उपलब्ध होणार नाही. तसेच, काश्मीर आणि आसाममधील परिस्थितीदेखील आपल्या देशातील तरुणांना रोजगार मिळवून देणार नाही, असे गांधी म्हणाले.

भारतीय लोकांना भारतीय असल्याचे प्रमाणपत्र मागणारे मोदी कोण? देशातील नागरिकांना भारतीय असण्याचे प्रमाणपत्र वाटण्याचा अधिकार मोदींना कोणी दिला? मला माहीत आहे मी एक भारतीय आहे आणि मला ते कोणासमोरही सिद्ध करण्याची गरज नाही, असेही राहुल यावेळी म्हटले.

हेही वाचा : 'सीएए'वरील युरोपीय महासंघातील मतदान ढकलले पुढे..

ABOUT THE AUTHOR

...view details