महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

शेळीने दिला मानव सदृश्य पिल्लाला जन्म, नागरिकांची पाहायला गर्दी - बंगळुरु

ही घटना मधुगीरी तालुक्यातील कालिनाहल्ली या खेडेगावामध्ये घडली. जानकिरामया असे शेळी मालकाचे नाव आहे. हे पिल्लू शेळीसारखे दिसते का? माणसासारखे यावर नागरिक तर्कवितर्क लढवत होते.

मानवसदृश्य शेळीचे पिल्लू

By

Published : Jul 28, 2019, 10:51 AM IST

बंगळुरु- तुमकूर जिल्ह्यामध्ये एका शेळीने माणसासारख्या दिसणाऱ्या पिल्लाला जन्म दिला आहे. शेळीने दोन पिल्लांना जन्म दिला. यातील एक शेळीचे पिल्लू माणसाच्या शरीरासारखे दिसत आहे. पिल्लाचे पाय मानवी हात आणि पाया प्रमाणेच दिसत आहेत. तर काही अवयव शेळीच्या अवयंवासारखे दिसत आहेत. शेळीचे विचित्र पिल्लू पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

ही घटना मधुगिरी तालुक्यातील कालिनाहल्ली या खेडेगावामध्ये घडली. जानकिरामया असे शेळी मालकाचे नाव आहे. शनिवारी सकाळी त्यांच्या शेळीने दोन पिल्लांना जन्म दिला. त्यातील एक पिल्लू व्यवस्थित असून दुसरे पिल्लू विचित्र आकारात जन्मले. त्याची त्वचाही माणसासारखी दिसत आहे. मात्र, जन्मानंतर थोड्याच वेळात त्या पिल्लाचा मृत्यू झाला.

मृत्यू झाल्यानंतर पिल्लाला एका खड्यात पुरण्यात आले. हे विचित्र पिल्लू परिसरात चर्चेचा विषय ठरले होते. हे पिल्लू शेळीसारखे दिसते का? माणसासारखे यावर नागरिक तर्कवितर्क लढवत होते.

ABOUT THE AUTHOR

...view details