पणजी : कोरोनाच्या चाचण्यांचा वेग वाढावा म्हणून गोव्यामध्ये रॅपिड अँटीजेन डिटेक्शन चाचण्या सुरू करण्यात येणार आहेत. गोव्यात सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या वास्को गावातील मंगूर हिल परिसरापासून या चाचण्यांची सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.
दरम्यान, मंगूर हिल भागाला डी-कन्टेन्मेंट झोन करण्याच्या शक्यता मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावल्या आहेत. या भागामध्ये कोरोनाचा प्रसार अजूनही होत असल्यामुळे येथील निर्बंध लागूच राहणार आहेत. मंगूर हिल भागातील एकूण आठ हजार भागांपैकी दोन हजार लोकांची कोरोना चाचणी आतापर्यंत पार पडली आहे.