पणजी - कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या प्रयत्नात गोवा पोलिसांनी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'घरंतच तुम रव' (आपण घरातच राहता) हा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. सध्याच्या लॉकडाऊन दरम्यान गोवा पोलिसांनी सोशल मिडीयाद्वारे हा व्हिडिओ प्रसिद्ध करून नागरिकांमधील जनजागृती करण्यासंबंधी भर पाडली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोवा पोलीस नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याविषयी विविध योजना अंमलात आणत आहे. आधी रस्त्यावर गाणे गाऊन कोरोनाविषयी जागरूकता पसरवली होती. तर, आता या घातक आजारापासून बचावासाठी घरीच राहण्याचे महत्त्व सांगण्यासाठी त्यांनी येथील स्थानिक कलाकारांचा समावेश करून 'घरंतच तुम रव' हा व्हिडिओ तयार केला आहे. याचा अर्थ आपण घरातच रहा, असा होतो.
गोव्याचे पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंह यांनी बुधवारी सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर 'घरंतच तुम रव' (आपण घरातच राहता) हा व्हिडिओ प्रसिद्ध केला. या व्हिडिओमध्ये गाणे पोलीस उपअधीक्षक एडविन कोलाको यांनी लिहिले आणि संगीतबद्ध केले आहे. कोलाको या व्हिडियोविषयी सांगताना म्हणाले, 'लॉकडाऊन कालावधीत हा व्हिडिओ एका घरात शूट करण्यात आला होता. मात्र, यादरम्यान, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे कुठेही उल्लंघन होणार नाही, याची पुरेपूर खबरदारी क्रू मेंबर्सनी घेतली होती.'