Live Update:
१२.३० pm - शिरोडा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार सुभाष शिरोडकर ६६ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे उमेदवार दिलीप ढवळीकर यांचा पराभव केला आहे.
शिरोडा विधानसभा निवडणुकीची आकडेवारी - सुभाष शिरोडकर(भाजप) - १० हजार ६६१ मते, दिपक ढवळीकर (महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष) - १० हजार ५८५, महादेव नाईक (आप) - २ हजार ०२ मते मिळाली आहेत.
११.०० am - पणजी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर, बाबूश मोन्सेरात विजयी होण्याची शक्यता
पणजी - पणजी विधानसभा मतदारसंघात २५ वर्षानंतर काँग्रेस विजयाच्या जवळ पोहचली आहे. काँग्रेसचे बाबूश मोन्सेरात हे १७५८ मतांनी आघाडीवर आहेत.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर या जागेवर १९९४ पासून निवडून येत आहे. त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली. मात्र, आताही जागा काँग्रेस जिंकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पणजी आणि म्हापसा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस आघाडीवर असून भाजप दुसऱ्या स्थानी आहे.पहिल्या फेरीत पणजी मतदारसंघात काँग्रेसचे बाबूश मोन्सेरात (2890) आघाडीवर आहेत. तर भाजपचे सिद्धार्थ कुंकळ्येकर (2383) द्वितीय स्थानावर आहे. तर म्हापसा मतदारसंघात काँग्रेसचे सुधीर कांदोळकर (1570) तर भाजपचे जोशूआ डिसोझा (1511) दुसऱ्या स्थानी आहेत. मांद्रे मतदारसंघात भाजपचे दयानंद सोपटे (1822) आघाडीवर तर अपक्ष जीत आरोलकर (1199) दुसऱ्या स्थानावर आहेत.