महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गोव्यात कोरोना मुद्द्यावरून राज्यपाल अन् मुख्यमंत्र्यांमधील मतभेद चव्हाट्यावर - goa corona NEWS

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यातील मतभेदानंतर विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री सावत यांचा राजीनामा मागितला आहे. मुख्यमंत्री लोकांची दिशाभूल करत असून सरकारचे अपयश झाकण्यासाठी खोटे बोलत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

सत्यपाल मलिक
सत्यपाल मलिक

By

Published : Jul 18, 2020, 6:27 PM IST

पणजी - गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यात धुसफूस सुरु झाल्याचे दिसून येत आहे. राज्यातील कोरोना संसर्गाच्या व्यवस्थापनावर माध्यमांतून जी टीका होत आहे, त्यावर राज्यपालांनी नाराजी दर्शवली, असे वक्तव्य प्रमोद सावंत यांनी गुरुवारी केले होते. मात्र, असे म्हटले नसल्याचे राज्यपाल मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

सावंत यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री आणि राज्यपालात मतभेद निर्माण झाले आहेत. सांवत यांनी जे सांगितले, ते मी बोललो नसल्याचे मलिक म्हणाले. तसेच त्यांनी कोरोना व्यवस्थापनावरूनही भाजप आघाडी सरकारवर टीका केली. राज्यपालांच्या सूचनेनुसार राज्यात काम करत असल्याचा विश्वास सावंत यांनी कालच्या(शुक्रवार) बैठकीत दिल्याचे राजभवनच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

मुख्यमंत्री सावंत यांनी राज्यपाल मलिक यांची काल राजभवनात भेट घेवून कोरोेनाच्या प्रसारावर चर्चा केली. राज्यपालांनी सरकारला पूर्ण पाठिंबा दर्शवला, असे राजभवनने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. राज्यपालांच्या सुचनांवर सरकार कार्यवाही करेल, असे आश्वासन सावंत यांनी दिले होते, असेही पत्रकात म्हटले आहे.

या वादानंतर विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री सावत यांचा राजीनामा मागितला आहे. मुख्यमंत्री लोकांची दिशाभूल करत असून सरकारचे अपयश झाकण्यासाठी खोटे बोलत असल्याचा आरोप केला आहे. गोवा राज्यामध्ये 1 हजार 337 कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून 21 जणांचा मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details