पणजी -गोवा आणि कर्नाटक या दोन राज्याला जोडणाऱ्या महामार्गाचे दुपटीकरण, तसेच रेल्वे मार्ग विस्ताराला काँग्रेसकडून विरोध करण्यात आला आहे. कर्नाटकातील कोळसा कंपन्या आपला माल गोव्यातील मोरमुगाव बंदरात उतरवतात. कोळशाच्या वाहतुकीमुळे आधीच गोव्यातील पर्यावरणाचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशातच गोवा आणि कर्नाटक या दोन राज्याला जोडणाऱ्या महामार्गाचा विस्तार करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या महामार्गाचा विस्तार कोळसा कंपन्यांच्या पथ्यावर पडणारा असून, त्यामुळे अधिक जलद गतीने कोळशाची वाहतूक गोव्यातील बंदरात होईल, आणि त्याचा फटका पर्यावरणाला बसेल असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
गोवा आणि कर्नाटक दरम्यान महामार्ग विस्ताराला काँग्रेसचा विरोध
गोवा आणि कर्नाटक या दोन राज्याला जोडणाऱ्या महामार्गाचे दुपटीकरण, तसेच रेल्वे मार्ग विस्ताराला काँग्रेसकडून विरोध करण्यात आला आहे. पर्यावरणाचे नूकसान करणारा हा निर्णय असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
गिरीश चोडणकर,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
दरम्यान या महामार्गाच्या विस्ताराला विरोध करण्यासाठी काँग्रेसकडून विषेश मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम #OnlyGoalSayNoToCoal या हॅशटॅग अंतर्गत सुरू करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली. तसेच सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी येणाऱ्या काळात कॉर्नर बैठका घेतल्या जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.