महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

काँग्रेस आमदारांचे भाजपमधील विलिनीकरण बेकायदा - गिरीश चोडणकर - goa politics

भाजपचे राष्ट्रीय आणि राज्यातील नेतृत्व पैसा आणि बळाचा वापर करून लोकशाही संपवत आहे. सरकारने रामराज्य आणण्याची स्वप्ने दाखवली. मात्र, सध्या रामराज्य आहे की, रावणराज्य याचे उत्तर गोवा प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर आणि मुख्यमंत्र्यांनी द्यावे, असा घणाघात चोडणकरांनी भाजपवर केला.

गिरीश चोडणकर

By

Published : Jul 18, 2019, 3:07 PM IST

पणजी- काँग्रेसमधून फुटन १० आमदारांनी भाजपध्ये प्रवेश केला. परंतु, हे विलिनीकरण बेकायदा आहे. यासाठी केंद्रीय अथवा राज्य कार्यकारिणीमध्ये तसा ठराव होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आज (गुरुवारी) केले.

गिरीश चोडणकर पत्रकार परिषदेत बोलताना

पणजीतील काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना चोडणकर म्हणाले, भाजपचे राष्ट्रीय आणि राज्यातील नेतृत्व पैसा आणि बळाचा वापर करून लोकशाही संपवत आहे. सरकारने रामराज्य आणण्याची स्वप्ने दाखवली होती. मात्र, सध्या रामराज्य आहे की, रावणराज्य याचे उत्तर गोवा प्रदेश भाजपाध्यक्ष विनय तेंडुलकर आणि मुख्यमंत्र्यांनी द्यावे, असा घणाघात भाजपवर केला.

पाठीत खंजीर खुपसण्याची भाजपची सवय जुनी आहे. १९९४ मध्ये भाजप आमदार महाराष्ट्र गोमंतकवादी (मगो)च्या पाठीवर बसून गोवा विधानसभेत पोहचले. परंतु, त्यानंतर मगोच्या पाठीत कसा खंजीर खुपसला हे सर्वांना माहीत आहे, असे चोडणकर म्हणाले. परंतु, गोव्यातील जनता यामधून का शहाणी होत नाही? हा प्रश्न आहे. त्यानंतर २०१७ मध्ये गोवा फॉरवर्डने लोकांना फसविले. त्या पक्षाच्या पाठीत आणि पोटातही भाजपने खंजीर खुपसला आहे. यांनी गोव्यातील जनतेला फसविले आहे, अशी टीका त्यांनी केली.

गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी नगरनियोजन मंत्री असताना कायद्यात दुरुस्ती करून छोट्या-छोट्या बाबींसाठी मंत्र्यांची परवानगी बंधनकारक केली होती. त्या विरोधात काँग्रेसचे तत्कालीन विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी विधानसभेत आवाज उठविला होता. तर काँग्रेसने विधासभेबाहेर आवाज उठविला होता. तेच कवळेकर भाजपमध्ये प्रवेश करून कृषीमंत्री बनले आहेत. त्यामुळे याविषयी त्यांनी सभागृहात आवाज उठवून दाखवावा, अन्यथा त्यांचेही हात भ्रष्टाचाराने बरबटले असे म्हणावे लागेल.

तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मृतदेह कला अकादमीत अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. त्याजागेचे सरकारी अधिकाऱ्यांनी शुद्धीकरण केले होते. त्यांच्यावर सरकारने आतापर्यंत कोणती कारवाई केली हे जाहीर करावे, अशी मागणी चोडणकर यांनी केली. गोव्यातील अंमलीपदार्थाचा प्रश्न गंभीर बनला आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या गोदामातच १०० किलोग्रॅम केटामाइन सारखा अंमलीपदार्थ सापडून त्यावर काहीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे सरकारने दुटप्पी बोलू नये, असे ते म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रीय अध्यक्षाला पाठिंबा देण्यासाठी आपण राजीनामा दिला होता. परंतु, पक्षाचे गोवा प्रभारी यांनी केलेल्या चर्चेनंतर आणि कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार सध्या काम पाहत असून पदावर कायम आहे, असेही चोडणकर यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details